जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

0

 

वर्धा- Wardha  सर्व सेवा संघ वाराणसी (यु.पी) Sarva Seva Sangh Varanasi (U.P.) येथील प्रकाशन विभाग व सर्वोदय आश्रमच्या जागेवर उत्तर प्रदेश सरकार जिल्हा प्रशासनाच्या मार्फत दंडुकेशाही करुन जबरदस्तीने संस्थेची जागा उध्वस्त करुन हडपण्याचा प्रयत्न सर्व सेवा संघ संस्थेला नोटीस पाठवून केला जात आहे. ही जागा रेल्वे प्रशासनाने 1960 ला आचार्य विनोबा भावेंना तत्कालिन रेल्वेमंत्री लालबहादुर शास्त्री यांनी गांधी विचार प्रसार केंद्र स्थापन करण्यासाठी दिली होती. त्याबाबतची सर्व प्रक्रीया पुर्ण करुन 1961 ला राजघाट वाराणसी येथील जागा रितसर सर्व सेवा संघाच्या नावावर कागदोपत्री करण्यात आली. सोबतच (यु.पी) सरकार व केंद्र सरकारच्या मनमानी, हुकुमशही धोरणाचा निषेध/विरोध करण्यासाठी देशभरातून गांधी विचारांच्या संस्था , संघटना मार्फत रस्त्यावर उतरून सत्याग्रह आंदोलन करित आहे. त्याच निमित्ताने वाराणसी येथे गेल्या एक महिन्यापासून सतत आंदोलन सुरू आहे. त्या सत्याग्रह-आंदोलनाला समर्थन देण्यासाठी वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळ व अन्य गांधी विचारांच्या संघटना संस्थांच्या मार्फत हे आंदोलन महात्मा गांधी पुतळ्यासमोर करण्यात आले.