अमरावती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (इर्विन)चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी आंबेडकर अनुयायी एकवटले आहेत. शेकडोच्या संख्येने अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत धरणे आंदोलन केले. 2016 पासून स्मारक प्रकरण उच्च न्यायालयात सुरु असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक सौंदर्यासाठी राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागत नाही आहे. प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरवठा करून देखील निकाल न लागल्याने अखेर अनुयायांनी न्यायालयात धाव घेतली असून आता निकाल लागेपर्यंत यात कुठलीही हालचाल होणार नसून राजकीय हालचालींमुळे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामधून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भिम अनुयायांनी मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
















