खामगाव – आषाढीवारी आटोपून संतनगरी शेगावची श्री गजानन महाराजांची पालखी आपली 54 वी वारी पूर्ण करून स्वगृही शेगावला परतत आहे.खामगावपासून शेगाव पर्यंत गजानन महाराजांची पालखी आज परतीच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा पूर्ण करत आहे.
सकाळी सहा वाजल्यापासून संत गजाननाची पालखी शेगाव कडे निघाली आहे. हजारो भाविक आपापली सेवा यामध्ये विविध प्रकारे देत आहेत.या पालखीसोबत राज्यभरातून लाखो भाविक खामगाव ते शेगाव या 18 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याच्या प्रवासात लहान मुलांसह वयोवृद्ध या पालखी सोबत शेगांव येथे निघालेले आहेत. त्यामुळे संत नगरी शेगावात मोठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे..शेगाव नगरीत भाविकांचा मोठा जनसागर लोटल्याने संत नगरी शेगावला मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे
















