या सरकारमुळे कुठल्याही प्रकारे असमतोल किंवा विषमता निर्माण होणार नाही – आशिष जयस्वाल

0

 

नागपूर-उपमुख्यमंत्री अजित पवार हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांचा प्रदीर्घ अभ्यास आहे. आता कुठल्याही पद्धतीने प्रादेशिक असमतोल किंवा विषमता निर्माण होणार नाही. आता मोठ्या प्रमाणात लोकांना न्याय देण्याचे काम या ठिकाणी होत आहे असा दावा शिंदे गटाचे शिवसेना आमदार आशिष जैस्वाल यांनी माध्यमांशी बोलताना केला. जैस्वाल म्हणाले, पहिल्यांदा ग्रामीण मार्गासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे. ज्या- ज्या आमदारांची ठळक कामे आहेत, त्यासाठी मागणी पूर्ण करावी, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत. आमदारांनी जनतेला दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती व्हावी यातून आमदारही समाधानी राहतील आणि पुढे त्यांना निवडून येण्यासाठी मदतच होईल. थोड्या प्रमाणात कमी जास्त होऊ शकतो. काही मतदारसंघात इरिगेशनचे महत्वाचे प्रश्न महत्त्वाचे असतात. मात्र, रस्त्यांच्या बाबतीत सम प्रमाणात निधी वाटप होत असतात काही मतदारसंघांमध्ये मोठे मोठे कामासाठी निधी आवश्यक असतात. सत्ताधारी नाहीतर विरोधकांना सुद्धा निधी दिला जातो. 288 मतदारसंघांमध्ये विकास झाला पाहिजे. ते करण्यासाठी महाराष्ट्राचे सरकार प्रयत्न करत आहे.
– राज्यासमोर खूप प्रश्न आहेत. विनाकारण भ्रम निर्माण करू नये, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करायचे. महाराष्ट्रातील सर्वांचे राजकीय वाद प्रतिवाद बंद करायला पाहिजे, आणि महाराष्ट्रासाठी, विकासासाठी काम करायला पाहिजे.

विरोधी पक्ष नेता कोण होणार यात आम्हाला रस नाही, त्यांचा निर्णय ते घेतील त्यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही.