
नागपूर(Nagpur), दि:5/5/2026
आज मंगळवार 5 /5/ 2026 रोजी महानगरपालिका आयुक्त श्री गणेश राठोड व उप आयुक्त अमोल चोरपगारे (उद्यान विभाग) यांना आम आदमी पार्टी नागपूर तर्फे राज्य सहसचिव रजनीकांत जिसकार यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने राज्य संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, नागपूर शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे व नागपूर महासचिव इकबाल रिजवी हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रकारे अहमद जवाद, प्रदीप पवनीकर, क्षितिज मेश्राम, विजय धकाते, तेजराम मदान व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
नागपूर शहरामधील महानगरपालिकेच्या विभिन्न उद्यानांमध्ये ग्रीन जिम लागलेले आहेत. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ह्या ग्रीन जिम मध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झालेला आहे. मागील पाच वर्षांमध्ये सुमारास एक ते दीड करोड रुपये ह्या ग्रीन जिमच्या रखरखा व सुधारित करण्यासाठी महानगरपालिकेने खर्च केला आहे. तरी महानगरपालिकेचे हे ग्रीन जिम दुर्लक्षित आहे. ह्या बिघाड झालेल्या ग्रीन जिम मुळे लोकांना इजा किंवा दुखापत व्हायची शक्यता आहे. आम आदमी पार्टीची मागणी आहे की त्वरित या ग्रीन जिमची सुधारणा व खराब झालेले उपकरण त्वरित बदलण्यात यावे.
महानगरपालिका उपायुक्त गणेश राठोड व उप आयुक्त अमोल चोरपगारे (उद्यान विभाग) यांनी उप अभियंता श्रीराम गुजर यांना ह्या विषयावर त्वरित कारवाई करण्यात यावी असे निर्देश दिले. तसेच येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी नागपूर शहरांमधील विभिन्न उद्यानांचा सर्वे करून महानगरपालिकेला देईल यावर देखील चर्चा झाली.
आम आदमी पार्टी नागपूर
















