शिंदे, फडणवीसांना राज ठाकरेंनी दिला असा सल्ला!

0

मुंबई: (Mumbai)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ‘जपून रहावे’ तर उपमुख्यमंत्री(Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर संबंध नीट ठेवावे’ असा सल्ला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या (MNS Leader Raj Thackeray) नेत्यांना दिला. मुंबईत आयोजित प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी (Ajit Pawar)अजित पवार यांनाही सल्ला दिला. ‘तुम्ही बाहेर जेवढे लक्ष देताय, तेवढेच काकांकडे पण लक्ष द्या’, असा टोमणा त्यांनी अजित पवारांना मारला. याच मुलाखतीत राज ठाकरे यांनी (Uddhav thackeary)उद्धव ठाकरे व (Aditya Thackeary)आदित्य ठाकरे यांचा ‘स्वयंभू’ म्हणून उल्लेख केला. (Amruta Fadnavis)अमृता फडणवीस आणि खासदार (Amol Kolhe)अमोल कोल्हे यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, उद्धव ठाकरे यांना कोणता मोलाचा सल्ला द्याल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

उद्धव ठाकरे यांचे नाव येताच राज ठाकरे यांनी ‘ उद्धव ठाकरेंना काय सांगणार मी? ते स्वयंभू आहेत’, असा उल्लेख त्यांनी केला.
सर्वच मोठे राजकारणी राजकारणात व्यस्त असतात. त्यांना घरी वेळ द्यायला मिळत नाही, अशी काहीशी तक्रार अमृता फडणवीस यांनी यावेळी केली. त्याला ठाकरेंनी आपल्या शैलीत उत्तर दिले. “मला तुमच्या घरच्या प्रश्नांमध्ये पडायचे नाही” असे उत्तर त्यांनी दिले. राज ठाकरे पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे सत्तेमध्ये आहे. 2014 साली ते मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पण खूप मोठी असते. कदाचित गेल्या सात-आठ वर्षांमध्ये तुम्हाला ते वेळ देऊ शकले नसतील. परंतु, त्याच्या आधी त्यांनी तुम्हाला वेळ दिला असून तुमचे फोटो पाहिलेत. परंतु, मला ते भेटले की त्यांना वेळ देण्याचा सल्ला देईल आणि ठिकाणही सांगेल.”

शर्मिला ठाकरे सक्रिय राजकारणात आल्या तर तुम्हाला चालेल का? या प्रश्नावर “मी घरचे काम करायला तयार आहे”, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले. शर्मिला ठाकरे राजकारणात येऊन तुमच्या पुढे निघून गेल्या, तर तुम्हाला झेपेल का? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, “मला काहीच अडचण नाही. पण तुमच्या नंतर लक्षात येईल की राज ठाकरे परवडला..”

 

बॉम्बोलोनी | How to Make Bomboloni Recipe | Donut Bomboloni Recipe | Ep-116 | Shankhnaad News |