सिंधुदुर्ग : (Eknath shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटविले जाण्याची शक्यता उद्योग मंत्री (Uday samant)उदय सामंत यांनी फेटाळून लावली. ठाकरे गटाचे उरलेले तेराही आमदार आमच्या संपर्कात असून (congress)काँग्रेसच्या एका बड्याने महाबळेश्वर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असा गौप्यस्फोटही सामंत यांनी केला. आता काँग्रेसचा हा बडा नेता कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संजय राऊत (sanjay raut)यांच्याबद्धल बोलताना सामंत म्हणाले की, संजय राऊत हे जगातील सगळ्यात शहाणे आणि विद्वान आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणं मी आता सोडून दिलेले आहे. त्यांच्या समोर स्पर्धक म्हणून जगात एकही विद्वान शिल्लक राहिला नाही. देशातील सगळ्या विद्वानांचे राऊत हे महामेरू बनलेले आहेत. जगातील विद्वानांपेक्षा राऊत यांना जास्त अक्कल आहे, त्यांच्यावर काय बोलायचं? अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी सरकारी कागद दाखवून शहाणपणा दाखवू नये, अशी टीका उदय सामंत यांच्यावर केली होती.