पुणे: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांबाबत महत्वाचे सुतोवाच केले आहे. निवडणूक आयोग “वन नेशन, वन इलेक्शन” साठी (CEC Rajiv Kumar on One Nation, One Election ) तयार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले असून यासंदर्भात निर्णय सरकारने घ्यावा, असेही ते म्हणाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे नाही. यामध्ये अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे याचा अंतिम निर्णय हा सरकारनेच घेतला पाहिजे. देशाच्या प्रत्येक भागातील प्रत्येक पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे. लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदानही आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. शहरी भागात मतदार नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने त्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुण्यातून होत आहे.
राजीव कुमार म्हणाले की, उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी मतदानाविषयी जनजागृती करुन पात्र कर्मचारी, कामगारांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करायला हवे. तृतीयपंथीय मतदार नोंदणीसाठी प्रकिया अतिशय सोपी केली असून तंत्रज्ञान, जन्म दाखला आदी समस्यांवर मार्ग काढला जाणार आहे. प्रत्येक राज्यात तृतीयपंथी मतदारांशी आम्ही संवाद साधत आहोत. निवडणूक प्रकियेच्या अनुषंगाने तृतीयपंथींयासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबाबत आयोग आवश्यक ती कार्यवाही करेल. मतदार प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुलभ, जलद गतीने होण्यासाठी ‘व्होटर हेल्पलाईन मोबाईल अॅप’, ‘नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टल ( एनव्हीएसपी), मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी ‘गरुडा’ मोबाईल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
Rajiv Kumar“वन नेशन, वन इलेक्शन” साठी केंद्रीय निवडणूक आयोग तयार, सरकारनेच निर्णय घ्यावा-मुख्य निवडणूक आयुक्त
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा