….. आणि रामललाच्या स्वागतास सज्ज व्हा!

0

कुजकी मानसिकता सोडा आणि रामललाच्या स्वागतास सज्ज व्हा!

सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आपल्या जन्मभूमीवर उभारल्या जात असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होत आहेत. संपूर्ण देशभर आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त ही विशेष लेखमाला.

| भाग 12 |

श्रीरामजन्मभूमी मंदिर आंदोलन हे राष्ट्रीय अस्मितेचा हुंकार तर होतेच शिवाय बेगडी धर्मनिरपेक्षतेचे बुरखे फाडणारे पण होते. म्हणूनच एकेकाळचे श्रीराम विरोधी आज रामललाच्या दर्शनासाठी उतावीळ झाले आहेत. पण या कथित धर्मनिरपेक्ष कंपूच्या श्रीरामविरोधी कारवाया थांबलेल्या नाहीत. त्यांची कुजकी मानसिकता आणि कुरापतींना बळ देण्याची त्यांची सवय बदललेली नाही. 22 जानेवारीला देश अयोध्येकडे डोळे लावून बसलेला असणार आहे. वातावरण राममय बनते आहे. अशावेळी पुन्हा एक नवी कुरापत काढणाऱ्या मानसिकतेचे दर्शन झाले आहे.
गठ्ठा मतांसाठी ज्यांच्या दाढ्या कुरवाळल्या गेल्या त्या पैकी एक जफर्याब जिलानी यांनी 6 डिसेंबर 1992 रोजी ध्वस्त झालेल्या ढाचाचा मलबा बाबरी मशिदीचे अवशेष म्हणून आम्हाला देण्यात यावे, हे तुणतुणे वाजवणे सुरू केले आहे. मुळात मुस्लिम समाजाने एक समजून घेतले पाहिजे की हिंदूंचा मशीद या प्रार्थना स्थळाला विरोध असता तर बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात गावोगावी दिमाखात उभ्या झालेल्या सर्वच मशिदींना विरोध राहिला असता. विरोध बाबराला आहे. कारण बाबराने या भूमीवर आक्रमण केले. तो परकीय आक्रमक होता. विरोध त्याने हिंदूंच्या आस्थेवर केलेल्या प्रहाराला आहे. राष्ट्रीय अस्मिता विरुद्ध गुलामगिरीचे अपमानजनक प्रतीक असा हा लढा आहे. *राष्ट्रीय गौरव वाढवणाऱ्या ए पी जे अब्दुल कलामांसमोर सारेच हिंदू नतमस्तक होतात. हे तुम्ही कधी समजून घेणार ?* आजही या देशात आपले लांगुलचालन होईल, ही मानसिकता सोडून राष्ट्रीय प्रवासात सामील होण्याची मानसिकता या समूहाने केली पाहिजे.
परंतु, बाबरी मशिदीचे निमित्त समोर करून बाबरी मशिदीचा मलबा आम्हाला मिळाला पाहिजे, अशी मागणी समोर करून कुरापतीचे षडयंत्र आखले जात आहे. न्यायालयीन निकालानंतर या विषयाला पूर्णविराम मिळायला हवा. पण पुन्हा ती कुजकी मानसिकता नव्या नव्या कुरापती काढून गालबोट लावण्याच्या प्रयत्नात आहेत.
बाबरीच्या मलब्यावर आमचा अधिकार आहे, असे सांगून खुसपट काढणे न्यायव्यवस्थेच्या विरुद्ध कृती आहे. श्रीरामजन्मभूमी मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पुन्हा असे मुद्दे उकरून काढणे खपवून न घेण्याच्या मानसिकतेत देश आला आहे. बाबरी मशीद ऍक्शन कमिटीचे संयोजक जिलानी यांना 22 जानेवारी दरम्यान पुन्हा उचकवून समोर आणण्या मागे सेक्युलर कंपूचा हेतू उघड होतो आहे. रामललाच्या पुनरस्थापनेला नख लावण्याच्या षड्यंत्रयाचाच तो एक भाग आहे.
जिलानी आणि त्यांच्या तारणहार राजकारण्यांनी , ”शरियत के मुताबिक किसी मस्जिद के मलबे का किसी और निर्माण में इस्तेमाल नहीं किया जा सकता है. बाबरी मस्जिद के ढहाए गए गुंबद, पिलर और दूसरे मलबे को मुस्लिम पक्ष को सौंप दिया जाना चाहिए था..” अशी भूमिका घेऊन आपला तिरपा सूर लावणे म्हणजे पुन्हा श्रीरामजन्मभूमी स्थळाला मशिदच मानणे आहे. मुळात इस्लाम नुसार वादग्रस्त जागेवर ईबादत होऊ शकत नाही. पण कथित धर्मनिरपेक्ष कंपूच्या पाठबळाने भारतात नेमके उलटे वारे वाहतात.
मुळात हिंदूंच्या मते बाबरी ढाचा ही श्रीरामजन्मभूमी होती. तिथे श्रीरामलला विराजमान होते. कोण्याही मशिदीत देवाची मूर्ती असू शकत नाही. तिथे नित्यनेमाने पूजा अर्चना सुरू होती. परकीय आक्रमकाने श्रीरामजन्मभूमी वर केलेले आक्रमण आणि लावलेला कलंक तेवढा हिंदू समाजाने पुसला. आता हिंदूंच्या दृष्टीने बाबराचा कलंक पुसला गेल्या असल्याने हिंदूंना कोणाच्या कुठल्या मागणीशी काहीच घेणे देणे नाही.
विवादित ढाचा ध्वस्त करणारे कारसेवक, रामभक्त हे तर एकेक विट प्रसाद म्हणून घेऊन गेले. आता असे विषय कुरापती म्हणूनच काढले जातील. पण असे राजकारण करणारयांनी एक बाब प्रकर्षाने ध्यानात ठेवावी, *तुम्ही हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहिला म्हणून हिंदूंनी इतिहास रचला. 6 डिसेंबर 1992 त्या हुंकाराचाच परिणाम होता. यावरून बोध घ्या आणि कुरापती न काढता रामललाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा !*
– शिवराय कुळकर्णी
9881717827