नागपूर, 5 एप्रिल 2023
साहित्य प्रसार केंद्राच्यावतीने नाट्यकर्मी प्रफुल्ल माटेगांवकर यांच्या ‘कृष्णार्पण… एक भाव कथा’ या पहिल्या दीर्घ कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार, 8 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. विदर्भ साहित्य संघाचे अमेय दालन, सांस्कृतिक संकुल, झांशी राणी चौक येथे होणा-या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहतील.
विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे आणि प्रसिद्ध पत्रकार व लेखक शैलेश पांडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. महिला महाविद्यालय, अमरावतीचे मुख्याध्यापक अविनाश मोहरील व प्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्ना पंडीत कथासंग्रहावर भाष्य करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली दुरुगकर करणार आहेत. साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य प्रसार केंद्र व प्रफुल्ल माटेगांवकर यांनी केले आहे.