अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा, सीबीआयला धक्का

0

नवी दिल्ली: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्याला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती देण्याची सीबीआयची (CBI)  विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे देशमुख यांना हा मोठा दिलासा (Big Relief for Anil Deshmukh in SC) मिळाला आहे. मनी लॉंड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आणि ईडीने देशमुख यांच्यावर कारवाई केली होती व जवळपास वर्षभर अनिल देशमुख हे आर्थर रोड कारागृहात होते. देशमुख यांना 1 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महाविकास आघाडीच्या शासन काळात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयने प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. 1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्याच महिन्यात देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यावर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा