नागपूर- एस.पी. सिंग यांची पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम) म्हणून नवी दिल्ली येथे झालेल्या PRSI च्या राष्ट्रीय परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि निवडणुकीत बिनविरोध निवड झाली.
डॉ. अजित पाठक (दिल्ली) यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी, नरेंद्र मेहता (वाराणसी) यांची उपाध्यक्ष (उत्तर), श्रीमती अनु मजुमदार (गुवाहाटी) उपाध्यक्ष (पूर्व) आणि श्री दिलीप चौहान यांची खजिनदारपदी एकमताने निवड करण्यात आली. यू एस सरमा (विझाग) उपाध्यक्ष म्हणून (दक्षिण) निवड झाली आहे. या नवीन जबाबदारीपूर्वी एस.पी. सिंग यांनी पीआरएसआय नागपूर चॅप्टरचे सहसचिव, सचिव आणि अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. उत्कृष्ट कार्यासाठी एस.पी. सिंग यांना सर्वोत्कृष्ट सचिव, सर्वोत्कृष्ट अध्यक्ष आणि राष्ट्रीय नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘पाटलीपुत्र टाइम्स’ आणि ‘प्रदीप’(पाटणा), ‘सनमार्ग’ (कोलकाता) आणि ‘लोकमत समाचार’ (नागपूर) या दैनिकांमध्ये पत्रकारिता केल्यानंतर ते ‘खणन भारती’ या हिंदी मासिकाचे सहसंपादक, कोल इंडिया लिमिटेडचे प्रतिनिधी आणि ईसीएल आसनसोल, एसईसीएल बिलासपूर आणि वेकोलि नागपूर येथे जनसंपर्क अधिकारी आणि सल्लागार (जनसंपर्क) म्हणून काम करून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दूरदर्शन, आकाशवाणीवर समकालीन विषयांवर लेख, कविता इत्यादी सादर करून हिंदी साहित्यातही मोलाचे योगदान दिले आहे.
नागपूर चॅप्टरचे नवनियुक्त अध्यक्ष यशवंत मोहिते, उपाध्यक्ष अखिलेश हळवे, सचिव मनीष सोनी, सहसचिव प्रसन श्रीवास्तव, खजिनदार शरद मराठे व इतर पदाधिकाऱ्यांनी सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष(पश्चिम) म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.