सोलापूर – महाराष्ट्रामध्ये सध्या कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात येत असून शेतकरी कांदा लागवडीकडे वळला आहे. त्यामुळे कांद्याचे दर हे खाली पडले असून शेतकरी कांदा फेकून देत किंवा गुराढोरांना खायला घालत आहे. अशाच परिस्थितीमध्ये खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा येथे काही महिला शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून त्यावर प्रक्रिया करत आहे कांदा शेतकऱ्याकडून खरेदी करतात त्याची साल काढतात त्याला स्वच्छ धुऊन काढतात आणि त्याच्या चकल्या बनवून मशीनमध्ये सुकवतात आणि सुकल्यानंतर स्वच्छ पिशवीमध्ये भरून कंपनीला देत आहेत. त्यातून त्यांना चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत रोजगार मिळत आहे. एकीकडे शेतकरी कांदा फेकून देतो तर त्यावरच महिला प्रक्रिया करून त्याच कांद्यामधून उपयुक्त असे बनवत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला काम मिळाल्याचे महिलांनी सांगितले.
















