
नागपूर- संजय गायकवाड यांच्या वायरल ऑडियो क्लिप संदर्भात त्यांनी माफी मागावी अशी मागणी अजितदादा पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली आहे. छगन भुजबळ हे जेष्ठ नेते आहेत. एका आमदाराने ज्येष्ठ मंत्र्याबद्दल बोलणं, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे वक्तव्य आहे. संजय गायकवाड ज्या शाळेत मोठे झालेत त्या शाळेचे प्राध्यापक छगन भुजबळ आहेत. गायकवाड यांच्या विरोधात वरिष्ठांनी सांगितल्यास आंदोलन करू, आमच्यासोबत युतीत असणाऱ्या आमदाराने अशी वक्तव्य करून मिठाचा खडा टाकू नये. तातडीने त्यांनी भुजबळांची माफी मागावी यावर भर दिला.अंजली दमानिया यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सध्या निवडणूक समोर असल्याने पावसाळ्यात जसे बेडूक बाहेर निघतात, तसे अंजली दमानिया बाहेर निघाल्या आहेत. याबाबतीत छगन भुजबळांनी स्पष्टीकरण दिल आहे, त्या काही ज्योतिषी नाहीत. ब्लॅकमेलिंगचे काम करण्यासाठी बाहेर आल्या आहेत. त्यांना फार महत्व देऊ नका असे पवार म्हणाले.