बुलढाणा – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या त्यांच्या जयंतीनिमित्त आज २ फेब्रुवारी रोजी खामगावात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. नांदुरा रोड वरील संत तुकाराम महाराज सामजिक सभागृह येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते पूजा तुकाराम महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व महाआरती पार पडली. यानंतर रजत नगरीतून भव्य शोभायात्रेला सुरूवात करण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत संताजी महाराज सभागृह भिसे प्लॉट येथे यात्रेचा समारोप झाला. शोभायात्रेत सहभागी वारकऱ्यांनी टाळ मृदंगाचा गजर करीत चौकाचौकात रिंगण घातले.