ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं निधन

0

कलाविश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धपकालानं सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे.

लावणीसम्राज्ञी’ असा लौकिक प्राप्त झालेल्या हिंदी, मराठी, चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 साली झाला. फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुलोचना चव्हाण यांनी भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामीळ, पंजाबी आदी भाषांतील गीते त्यांनी गायिली. पण मराठी सिनेमांमधील लावणी त्यांची खरी ओळख ठरली. त्यासाठी ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब आचार्य अत्रे यांच्याकडून प्राप्त झाला.

बोर्डावरची लावणी माजघरात आणणाऱ्या सुलोचना चव्हाण यांच्या मोठ्या बहिणीने त्यांना कलाक्षेत्रासाठी प्रोत्साहन दिले. लग्नाआधी त्यांनी सुमारे 70 हिंदी सिनेमांमध्ये पार्श्वगायन केलं. महत्त्वाचं म्हणजे वयाच्या 10 वर्षापासून त्यांना गायनाला सुरुवात केली. वयाच्या सोळाव्या वर्षी मन्ना डे यांच्यासोबत त्यांनी ‘भोजपुरी रामायण’ गायिलं.

सुलोचना चव्हाण यांच्या गाजलेल्या लावण्या

‘रंगल्या रात्री अशा’ सिनेमातील सुलोचना चव्हाण यांच्या लावण्या खूपच गाजल्या. ‘नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची मला हो म्हंत्यात लवंगी मिरची’ ही लावणी प्रचंड गाजली. ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा ’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘कसं काय पाटील बरं हाय का?’ अशा अनेक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी गायल्या आणि त्या लोकप्रिय झाल्या.

आजही सुलोचना चव्हाण यांनी गायिलेल्या लावण्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी फक्त लावण्याचं नाही, तर भावगीते आणि भक्तिगीतेदेखील गाऊन लोकसंगीताचं दालन समृद्ध केलं

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा