सामाजिक न्याय सप्ताहातंर्गत सेवा उपक्रम

0

नागपूर : अडीच हजार सामाजिक संस्थांची शिखर संस्था असणाऱ्या महा एनजीओ फेडरेशनद्वारा आयोजित सामाजिक न्याय सप्ताह दरम्यान सेवा उपक्रम आयोजित करण्यात आले. संस्थापक शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रभर अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक न्याय आठवड्यात सहभाग घेत जनमाणसांपर्यंत अर्थ संकल्प माहिती, शासकीय योजना, रुग्णसेवा , डिजिटल इंडिया, जल जीवन बाबत जागरुकता, नेत्रदान व आरोग्य शिबीर, ग्रामस्वछता, व्यसनमुक्ती, रक्तदान शिबीर, महिला सक्षमीकरण व्यक्तिमत्व विकास व सामाजिक प्रबोधन, जल व्यस्थापन आदी उपक्रमातून मदत करण्यात आली.
श्रीकृष्ण बहुउदेशीय संस्था आणि महाएंजीयो फ़ेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोन्हीसीम इथे भारतीय जनता पार्टी वर्धापन दिवसानिमित विविध शासकीय योजना, उपक्रमांची माहितीचे आयोजन संस्थेच्या संचालिका संध्या राजेश भोयर यांनी केले. योगेश आमरे ,सुषमा नागपूरे बिट्टू दिदी यांनी नोंदणी केली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचे मार्गदर्शनात मुकुंद शिंदे, शेखर मुंदडा यांच्या सहकार्याने हे यशस्वी आयोजन करण्यात आले