मास्कचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0

नागपूर (Nagpur)  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरीता मास्कचा वापर हे प्रभावी साधन आहे. सर्व नागरिकांनी घराबाहेर निघाल्यानंतर मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांनी केले आहे.मास्कच्या वापरासह (Corona) कोविडबाबत योग्य वर्तवणूक करावी. गर्दीच्या आणि बंदिस्थ ठिकाणी विशेषत: सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती आणि वृद्ध यांनी जाणे टाळावे. शिंकताना किंवा खोकलतांना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल, टिश्यू पेपरचा वापर करावा. हाताची स्वच्छता राखणे, वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे तसेच कोविड लक्षणे (covid symptoms) आढळल्यास तत्काळ कोविड चाचणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रसार व प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोविडबाबत योग्य वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

कोरोना इज बॅक! साताऱ्यानंतर आता ‘या’ जिल्ह्यात मास्क वापरण्याचं आवाहन

 देशात कोरोना संसर्गाने चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रातही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काही ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली आहे. नुकतेच सातारा जिल्हा प्रशासनाने सरकारी आणि निम सरकारी कार्यालये, कॉलेज आणि बँकांमधील कर्मचाऱ्यांना मास्क बंधनकारक केलं आहे. आता नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मास्क वापरण्याचे आवाहन केलं आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरीता मास्कचा वापर हे प्रभावी साधन आहे. सर्व नागरिकांनी घराबाहेर निघाल्यानंतर मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. मास्कच्या वापरासह कोविडबाबत योग्य वर्तवणूक करावी. गर्दीच्या आणि बंदिस्थ ठिकाणी विशेषत: सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती आणि वृद्ध यांनी जाणे टाळावे. शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल, टिश्यू पेपरचा वापर करावा. हाताची स्वच्छता राखणे, वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे तसेच कोविड लक्षणे आढळल्यास तत्काळ कोविड चाचणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रसार व प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोविडबाबत योग्य वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

आता कोविड बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. इतकेच नाही तर दररोज कोविड प्रकरणांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनचे नवीन प्रकार भारतात चिंताजनक वेगाने पसरत असल्याचं म्हटलं आहे. Omicron XBB.1.16 हा नवा व्हेरिएंट जुन्या व्हेरियंटपेक्षा जास्त धोकादायक असल्याचं सांगितलं जातं आहे. या नव्या व्हेरिएंटपासून स्वतःचा बचाव करण्याचे जीव वाचवण्याचे तीन मार्ग आहेत. अशा तीन गोष्टी आहेत, ज्या या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी तुमच्याकडे असायलाच हव्यात. त्या खालीलप्रमाणे.

कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांनी मास्कचा वापर करावा, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. हा विषाणू हवेत राहतो. श्वासाद्वारे, ते निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि त्यास संक्रमित करू शकते. एवढंच नाही तर लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

हँड सॅनिटायझर

कोरोनापासून वाचण्यासाठी हात साबणाने आणि पाण्याने चांगले धुवावेत असा सल्ला दिला जातो. पण जर तुमच्याकडे हँड सॅनिटायझर असेल तर तेदेखील वापरता येते. आता तुम्ही हँड सॅनिटायझर सोबत ठेवू शकता आणि त्याचा नियमित वापर करू शकता

ऑक्सिमीटर सोबत ठेवा

हवामान बदलाबरोबर खोकला, सर्दी, ताप, सर्दी यांसारख्या तक्रारीही वाढू लागतात. परंतु हे Omicron XBB.1.16 प्रकाराची लक्षणे देखील असू शकतात. यामध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी अचानक कमी होऊ शकते. अशा स्थितीत श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. असे कोणतेही लक्षण दिसल्यास ऑक्सिजनची पातळी ऑक्सिमीटरने तपासता येते.