महाराष्ट्रात येण्यापूर्वी राहुल गांधींनी माफी मागावी-बावनकुळे

0

नागपूर (Nagpur) –  ‘राहुल गांधींनी (Rahul Gandhi) महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी माफी मागावी’, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Rahul Gandhi must apologise on statement on Savarkar) यांनी दिला आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाच वेळा अपमान केला आहे. राहुल गांधींची अजूनही भूमिका बदललेली नाही. ती त्यांनी स्पष्ट केलेली नाही. ते आपल्या वक्तव्यांबद्दल माफी मागण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल (swatantra veer savarkar)  केलेल्या सर्व वक्तव्यांबद्दल माफी मागावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राहुल गांधी हे महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, अशी चर्चा आहे. त्यावर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची भेट जर कोणाचा डॅमेज कंट्रोल असेल, तर आम्हाला त्याबद्दल काही बोलायचे नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांची अवहेलना केली. त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांची तब्बल पाचवेळा ही चूक केली आहे. अनेकांनी राहुल गांधी यांना समजावण्याचाही प्रयत्न केला. तरीही त्यांनी अपमान केला. त्यामुळे महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी व त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा, असा इशारा बावनकुळेंनी दिला.