ठाणे जिल्हात शहापुर तालुक्यात असलेल्या माहुली किल्ल्यावर छत्रपती शिवरायांवर शिवगर्भ संस्कार झाले अशी इतिहासात नोंद आहे. इतिहासिक महत्व लाभलेल्या या किल्ल्यावर महाराष्ट्र शासन व पुरातत्व विभागाचे पूर्ण पणे दुर्लक्ष करत असुन या किल्ल्यावर दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी कोणत्याही प्रकारची वेवस्था दिसून येत नाही.
या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या किल्ल्याचे संवर्धन व्हावे या साठी शंभुदुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्था दरवर्षी माहुली किल्ल्यावर नवं वर्षाच्या स्वागतार्ह किल्ले संवर्धन मिहिमेचे आयोजन करते. नेहमी प्रमाणे या वर्षी सुद्धा शंभुदुर्ग प्रतिष्ठान या संस्थेने माहुली किल्ल्यावर दुर्ग संवर्धन मिहिमेचे अयोजन करून किल्लीवर सुरक्षित रस्ते तयार करून पौराणिक वास्तूंची स्वच्छता केली तसेच गडावर येणाऱ्या पर्यटकांना गड चढतांना रस्त्यांची माहिती व्हावी या साठी दिशादर्शक फलक लावले व भगवा ध्वज उभारला. शासन या किल्ल्यावर स्वतः दुर्लक्ष करत आहेच त्याचबरोबर किल्ल्यावर स्वछता करणाऱ्या सामाजिक संस्थांना सुद्धा मनाई करते, हे शासन शिवशाहीचे की मोघलांचे असा प्रेश्न या माध्यमातून उपस्थित होतो.
शंभुदुर्ग प्रतिष्ठान संस्थेने नवं वर्षाच्या स्वागतार्ह आयोजित केलेल्या मोहिमेचे अधिकृत पत्रक काढून माहुली गड ज्या वन क्षेत्रात येत्या त्या वन अधिकाऱ्याना पत्रक देऊन सुद्धा वन अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाचा वापर करून शंभुदुर्ग प्रतिष्ठानची मोहीम थांबविण्याचा प्रयत्न केले. प्रशासनाचा मोघलाई आदेश मोडून काढण्यासाठी संस्थेने माहुली गडाच्या पायथ्याशी आंदोलन करून आपला हक्क मिळविला परंतु गड संवर्धन करण्यास झालेली मनाई पहाता शासनाचा निषेध सुद्धा नोंदविला. ठाणे, मुंबई, वाडा, पालघर, रायगड, नवी मुंबई, सांगली, नाशिक आशा अनेक जिल्ह्यातून आलेल्या शेकडो तरुणांनी आंदोलनाच्या माध्यमातून एकच मागणी केली की शासनाने गडकिल्ले संवर्धनात सामाजिक संस्थांना कोणतीही मनाई करू नये अन्यथा या पुढे मनाई केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले जाईल. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या विषयात लक्ष देऊन वेळीच ओपल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची कान उघडणी करावी अशी मागणी केली.