NCP राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना जनताच जागा दाखवेल-शरद पवार

0

कराड- राष्ट्रवादी काँग्रेस Nationalist Congress फोडणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी आज कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यावर कार्याकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत शरद पवार यांनी प्रीतीसंगम येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. यावेळी कोल्हापूरचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.ajit pawar TOday news 

आजपासून आपली लढाई सुरु झाली असल्याचा निर्धार व्यक्त करून शरद पवार म्हणाले की, विरोधातील सर्व सरकारे अशाच प्रकारे उलथून टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लोकशाहीचा अधिकार जतन गरज आहे. महाराष्ट्र आणि देशात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

फोडफोडीच्या भाजपच्या प्रवृत्तीला आपल्यातील काही लोक बळी पडले. या फोडाफोडीचा काही फायदा होणार नाही. अशा प्रवृत्तींना महाराष्ट्रातील सामान्य जनता उलथवून लावल्याशिवाय राहणार नाही. लवकरच आपल्याला लोकांमध्ये जाण्याची संधी मिळेल. आपण लोकांपर्यंत जावू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यामध्ये नवी पिढी तयार केली. प्रत्येक जिल्ह्यात युवकांचा संच निर्माण केला. त्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास केला. आता सामान्य माणसांचा लोकशाहीचा अधिकार जपला पाहिजे, असे पवार म्हणाले.
यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो…, शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत.