Home MAHARASHTRA आज -उद्या वर्धेत शरद पवार, उध्दव ठाकरेंच्या सभा

आज -उद्या वर्धेत शरद पवार, उध्दव ठाकरेंच्या सभा

0

नागपूर (Nagpur):वर्धा लोकसभेचे महाविकास आघाडीचे, तुतारी चिन्हावर निवडणूक लढणारे काँग्रेसचे माजी आमदार शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी आज 21 एप्रिलला शरद पवार,उद्धव ठाकरे येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल सभा झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: शरद पवार आले होते आता त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार हे दोन दिवस वर्धा लोकसभेच्या दौऱ्यावर येत असून वरुड व हिंगणघाट येथे जाहीर सभा घेणार आहेत. हिंगणघाट येथील सभेत शिवसेना (उबाठा) चे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे सुध्दा उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांनी दिली.
२१ एप्रिलला सायं. ५ वाजता वरुड येथे शरद पवार यांची जाहीर सभा होणार असून या सभेला प्रामुख्याने पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व खासदार डॉ अमोल कोल्हे हे उपस्थित राहणार आहेत. २२ एप्रिलला सायं. ५ वाजता हिंगणघाट येथे जाहीर सभा होणार असून या सभेला शरद पवार यांच्यासोबत उध्दव ठाकरे व आम आदर्मी पार्टीचे संजय सिंग हे सुध्दा येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.