एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात तातडीने केले दाखल    

0

 अंगात ताप, घशाचा संसर्ग, WBC ही घटल्या 

(Mumbai) : महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या एका दिवसावर आला असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर घशाच्या संसर्गावर उपचार होणार असल्याची माहिती आहे. महायुतीचे नेते आणि हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी आहेत.दरेगाववरुन दोन दिवसांत एकनाथ शिंदे ठाणे येथील निवासस्थानी आले. त्यानंतरही त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाली नाही. आता ज्युपिटर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यासाठी ते ज्युपिटर रुग्णालयात पोहचले. यापू्र्वी त्यांची डेंग्यूचा चाचणी केली होती. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतु त्यांना अशक्तपणा असल्याची डॉक्टरांनी सांगितले. यामुळे त्यांना पुन्हा आरामाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही बरी नसल्याने आज ते कुठेही बैठकीला जाणार नाही. मंत्रिपदे आणि इतर राजकीय बाबींवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे हे आज शिवसेनेच्या नेते आणि आमदारांची ऑनलाइन बैठक घेणार होते. परंतु आता पुन्हा तब्ब्येत बिघडल्याने ही बैठक होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसंच महायुतीची रखडलेली एकत्रित बैठकही आज होण्याची शक्यता होती. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाविषयी सविस्तर केली जाणार होती. मात्र आता या बैठकीबाबतही अनिश्चिता निर्माण झाली आहे.