जागरभक्तीचा: नागपुरात आध्यात्मिक महोत्सवाचे आयोजन

0
जागरभक्तीचा नागपुरात आध्यात्मिक महोत्सवाचे आयोजन
जागरभक्तीचा नागपुरात आध्यात्मिक महोत्सवाचे आयोजन
नागपूर | खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपुरातील नागरिकांसाठी भव्य आध्यात्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जागरभक्तीचा या नावाने ओळखला जाणारा हा कार्यक्रम १४ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान, रोज सकाळी ७ ते ९ या वेळेत ईश्वर देशमुख क्रीडा प्रांगण, क्रीडा चौक, नागपूर येथे होणार आहे.

महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध दिवशी वेगवेगळ्या धार्मिक स्तोत्रांचे पठण होणार आहे:

१४ डिसेंबर (शनिवार): श्री हनुमान चालीसा पठण

१५ डिसेंबर (रविवार): श्री रामरक्षा व श्री मारुतीस्तोत्र पठण

१६ डिसेंबर (सोमवार): परित्त देशना परित्राण पाठ

१७ डिसेंबर (मंगळवार): श्री हरिपाठ

१८ डिसेंबर (बुधवार): श्री गणपती अथर्वशीर्ष पठण

१९ डिसेंबर (गुरुवार): श्री गजानन विजय ग्रंथाचा २१ वा अध्याय पठण

२० डिसेंबर (शुक्रवार): शालेय विद्यार्थ्यांचे मनाचे श्लोक पठण

२१ डिसेंबर (शनिवार): सुंदरकांड पठण

२२ डिसेंबर (रविवार): पुरुष सूक्त व श्री सूक्ताचे पठण

कार्यक्रम आयोजकांनी नागरिकांना या भक्तीमय जागरात सहभागी होऊन आध्यात्मिक आनंद लुटण्याचे आवाहन केले आहे.02:21 PM