
अमरावती- उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अमरावती शहरात भावी पंतप्रधान म्हणून पोस्टर लागले आहेत. या बॅनरची जोरदार चर्चा आहे.
ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी हे पोस्टर लावले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.पक्षात बंडाळी झाली. त्यानंतर प्रथमच यवतमाळ जिल्ह्यात ९ जुलै रोजी उद्धव ठाकरे येत आहेत. पोहरादेवी येथे दर्शन घेऊन पालकमंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या दिग्रस येथे उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. सावधान गद्दारांनो तुमचा बाप दिग्रसला येत आहे, अशा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी मंत्री, खासदार यांना दिला आहे.