रेल्वेचा प्रवास स्वस्त होणार

0

 

नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास स्वस्त होणार आहे. वंदे भारतसह सर्व गाड्यांचे एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास आणि विस्टाडोम कोचचे भाडे २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने जाहीर केलाय. रेल्वे गाड्यांमधील जास्तीत जास्त जागांचे आरक्षण व्हावे, यासाठी तिकिटांच्या दरात ही कपात केली जाणार असल्याचे रेल्वेक्या सूत्रांनी सांगितले. ते वाहतुकीच्या स्पर्धात्मक पद्धतींवर अवलंबून राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३० दिवसांत ज्या गाड्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी जागा आरक्षित आहे, अशा गाड्यांमध्ये सवलत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना रेल्वे बोर्डाने रेल्वे मंडळाने केली आहे. मूळ भाड्यावर जास्तीत जास्त २५ टक्के सूट मिळणार आहे. मात्र,आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार, जीएसटी इत्यादी इतर शुल्क सध्याच्या प्रमाणेच आकारले जाणार आहे. हा निर्णय तातडीने लागू करण्यात येणार आहे. तथापि, हा निर्णय नव्या बुकिंगसाठी लागू राहणार असून यापूर्वीच बुक केलेल्या प्रवाशांना भाड्याचा परतावा दिला जाणार नाही. प्रवासाच्या पहिल्या किंवा शेवटच्या टप्प्यासाठी, मध्यवर्ती स्टेशन्ससाठी किंवा सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या प्रवासासाठी सवलत दिली जाऊ शकते.