शिवशाही बसला भीषण आग चालकाचे प्रसंगावधान ; 16 प्रवासी सुरक्षित

0

नागपूर. अमरावतीच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसला अचानक आग लागली (Shivshahi bus going towards Amravati caught fire). यावेळी बसमध्ये 16 प्रवासी प्रवास करीत होते. बसचालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस रस्त्याच्या खडेला थांबविली. प्रवाशांना खाली उतरण्याची सूचना केली. सारे प्रवासी खाली उतरताच आगीने विक्राळरूप धारण करीत संपूर्ण बसलाच विळख्यात घेतले. संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नागपूर- अमरावती महामार्गावर (Nagpur-Amravati highway ) कोंढाळीजवळीच्या (Near Kondhali) साई मंदिराजवळ मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. बसचे मोठे नुकसान झाले असले तरी सर्वच प्रवासी सुरक्षित बचावले. ही बस नागपूरच्या मध्यवर्ती स्थानकावरून प्रवाशांना घेऊन अमरावतीच्या दिशेने रवाना झाली होती. गेल्या दोन महिन्यातील बसला आग लागण्याची ही दुसरी घटना ठरली आहे.

नागपूर ते अमरावती जाणारी एमएच- 06, बीडब्लू- 0788 क्रामाकाची शिवशाही बस सकाळीच नागपूरहून निघाली होती. गाडी कोंढाळीजवळच्या साई मंदिराजवळ आली असताना इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालक अब्दुल जहीर शेख यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बस लगेच रस्त्याच्या कडेला लावली, यावेळी वाहक (कंडक्टर) उज्वल देशपांडे यांनी गाडीतील प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. यावेळी गाडीत असलेले सर्व 16 ही प्रवासी वेळीच खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान प्रवासी गाडी खाली उतरताच आगीने उग्र रूप धारण केल्याने यात जळून संपूर्ण बस भस्मसात झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला, त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तो पर्यंत बस संपूर्णपणे जळून खाक झाली होती. यानंतर एसटी महामंडळाच्या दुसऱ्या बसने प्रवाश्यांना पुढे पाठविण्यात आले.
शिवशाही बसला आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. सुमारे 2 महिन्यांपूर्वी देखील अशीच घटना अमरावती मार्गावरच घडली होती. अमरावती डेपोची शिवशाही बस एमएच 06, बीडब्ल्यू-0289 चालक अमोल मोहरकार आणि वाहक लाईक खान नागपूरच्या गणेशपेठ बसस्थनक येथून अमरावतीसाठी निघाले होते. बसमध्ये आठ प्रवासी होते. वाडीमार्गे निघालेल्या बसने गोडखैरी टोल नाका ओलांडल्यावर मागच्या चाकातून आगीच्या ठिणग्या आणि धूर निघू लागला. वाऱ्याने धुर पसरत होता. चालकाने प्रसंगावधान दाखवित बस थांबवित प्रवाशांना पटापट बसच्या बाहेर काढले. फायर इंस्टिग्यूशरने आग विझविली होती.

 

भेलपुरी पापड कोन चाट आणि छोले चॅट रॅप | Bhelpuri Papad Cone Recipe|Chhole Chaat Stuffed Roll |EP-106