वासीसीईमध्‍ये अल्‍पकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ

0

नागपूर (NAGPUR) | ७ मे २०२५ –
यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय (वायसीसीई), नागपूर मेकॅनिकल इंजिनीयरींग विभागाद्वारे ७ मे “ब्रिजींग द गॅप बिटविन थेरॉटिकल अँड फिजिकल वर्ल्‍ड इन मेकॅनिकल इंजिनियरींग डोमेन” या शीर्षकाच्या डीएसटी एसईआरबी पुरस्कृत एक आठवड्याच्या अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाला (एसटीटीपी) प्रारंभ झाला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्‍हणून नितीन लोणकर, विभागप्रमुख डॉ. जयंत गिरी आणि डॉ. आर. बी. चडगे उपस्थित होते. वास्तविक जगातील औद्योगिक पद्धतींशी जुळवून घेण्याच्‍या गरजेवर त्‍यांनी भर दिला. त्यांनी नवोपक्रमांना चालना देण्यासाठी आणि तरुण अभियंत्यांची रोजगारक्षमता वाढविण्यात अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली.

प्राचार्य अभ्यासक्रम समन्वयक डॉ. शरद चौधरी यांनी आठवड्याभराच्या तांत्रिक सत्रांचा आढावा घेतला. या उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापन आणि प्राचार्य डॉ. यू. पी. वाघे यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणा आणि प्रोत्साहनाबद्दल त्यांनी आभार मानले. समारोप प्राध्यापक डी. एन. कश्यप यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.