लवकरच अजित पवार मुख्यमंत्री होतील-पृथ्वीराज चव्हाण

0

मुंबई : येत्या १० ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतराबद्दल निर्णय होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे भाकित माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेय. चव्हाण म्हणाले, आगामी लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केल्यास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढणार नाही. त्याचे कारण म्हणजे ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. भाजपकडे आता अजित पवार यांचा पर्याय आहे. त्यांना मुख्यमंत्री केले जाईल, असेही चव्हाण म्हणाले.
अजित पवार यांना भाजपकडून मुख्यमंत्री केले जाईल, अशी चर्चा सातत्याने सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढलेल्या दिल्ली वाऱ्यांमुळेही चर्चेत अधिकच भर पडत आहे.