कर्मचारी संपावर : रुग्णसेवा विद्यार्थ्यांच्या भरवशावर

0

 

नागपूर : ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ अशी घोषणा देत कर्मचारी बेमुदत संपावर गेले असल्याने शासकीय आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडली आहे. कर्मचारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी नागपुरातील शासकीय रुग्णालयात रुग्ण उपचाराबाबत समस्या आ वासून उभ्या राहिल्या आहेत. रुग्णालयाच्या परिचारिका व सफाई कामगार संपावर गेल्यामुळे रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेस विलंब होत आहे. जी.एम.सी रुग्णालयाचे अधिष्ठाता राज गजभिये यांनी सांगितले की, फक्त अतिआवश्यक शस्त्रक्रिया रुग्णालयामध्ये होत आहेत. त्या व्यतिरिक्त उर्वरीत शस्त्रक्रिया संपानंतर केल्या जाणार आहेत. रुग्णालयामध्ये सध्या कर्मचारी संपावर गेल्यामुळे नर्सिंगचे शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांकडून पर्यायी व्यवस्था केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यसरकारने एक अध्यादेश जारी करून, तात्पुरत्या स्वरुपात काही परिचारिका आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची परवानगी बहाल केली आहे. त्यानुसार नागपूरच्या शासकीय रुग्णालय दोनशे कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे.