राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलन 12 जानेवारीपासून

0
राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलन 12 जानेवारीपासून
state-level-marathi-language-lovers-educational-literature-conference-from-12th-january

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अभिनेते अंकुश चौधरी यांची उपस्थिती

नागपूर (Nagpur) :- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्‍यानंतर ‘मराठी ज्ञानभाषा व्‍हावी’ ही जिद्द मनाशी बाळगून ‘आम्‍ही मराठी’ ही चळवळ सुरू करण्‍यात आली आहे. त्‍याअनुषंगाने, नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग नागपूर, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 14 जानेवारी 2025 या कालावधीत राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे रविवार, 12 जानेवारी रोजी सायं. 6 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून मराठी सिने कलावंत अंकुश चौधरी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे भूषविणार असून स्वागताध्यक्ष विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदिप दाते हे राहतील. याप्रसंगी सर्व आमदार अभिजीत वंजारी, मोहन मते, प्रविण दटके, विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिध्देश्वर काळुसे, डस्कलाईन इंफ्रा. लि. चे संचालक समीर महाजन, विदर्भ साहित्य संघाचे सचिव विलास मानेकर आणि मनपाच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे पियुष आंबुलकर यांची विशेष उपस्थिती राहील. तत्‍पूर्वी, ग्रंथ दिंडीचे आगमन व पूजन झाल्‍यानंतर सायं. 5.30 वाजता मराठी बँडचे विशेष सादरीकरण होणार आहे.

परिसंवाद, चर्चासत्र कविसंमेलन

सोमवार, 13 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ‘बालभारती आणि मराठी मनाचे नाते’ या विषयावरील परिसंवादात साहित्य अकादमी बालसाहित्यिक पुरस्कार प्राप्त लेखक एकनाथ आव्हाड, मोहन शिरसाट, प्रतिभा इंगोले, प्रकाश एदलाबादकर, मधुकर धर्मापुरीकर या लेखकांचा यात सहभाग राहील. सूत्रसंचालन प्रतिभा लोखंडे आणि ज्ञानेश हटवार करतील. त्यानंतर 11.45 वाजता ‘मराठी सद्यस्थिती व ज्ञानभाषा दिशा’ या विषयावरील चर्चासत्रात आ. अभिजीत वंजारी, माजी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, विदर्भ संशोधन मंडळाचे सचिव डॉ. राजेंद्र वाटाणे, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले आणि मराठी अभ्यास मंडळ, पुणे चे सदस्य प्रा. डॉ. पांडुरंग कंद यांचा सहभाग राहील. सूत्रसंचालन प्रा. सुरेश नखाते करतील तर मुलाखत वृषाली देशपांडे घेतील. दुपारी 2 वाजता माजी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या उपस्थितीत शिक्षकांचे शैक्षणिक नवोपक्रम सादरीकरण स्पर्धा होईल.

– तीन दिवस भरगच्‍च कार्यक्रम

सूत्रसंचालन आर. जे. अनूप करतील. त्‍यानंतर 3.45 वाजता ‘ज्ञानभाषा प्रवासात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची भूमिका’ या विषयावरील चर्चासत्रात शिक्षण मंडळाचे सहसचिव रवींद्र काटोलकर, राज्‍य माहिती आयुक्‍त राहुल पांडे, तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, एबीपी माझा मुंबईच्या सरिता कौशिक आणि दैनिक सकाळचे संपादक प्रमोद काळबांडे सहभागी होतील. सायं.5.30 वाजता कवी बबन सराटकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. यात मनिषा रिठे, प्रसेनजित गायकवाड, मीनल येवले, प्रकाश कांबळे, डॉ. मनोहर नरांजे, वसंत गोमासे, गणेश भाकरे, सुनिल वाडे, उज्‍ज्वला अंधारे, प्रा. भगवंत शोभणे, विशाल देवतळे तसेच, बालकवी वल्लभ गावंडे, युक्ता गोमासे आणि स्वरश्री तांदुळकर यांचा सहभाग राहील. सूत्रसंचालन प्रा. संजय तिजारे करतील. सायं. 6.45 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

समारोपीय कार्यक्रम

मंगळवार, 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता डॉ. रविंद्र शोभणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार असून याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आ. विकास ठाकरे, माजी महापौर संदीप जोशी, विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष माधुरी सावरकर, सचिव चिंतामण वंजारी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मानसी कोलते करणार आहेत. बक्षिस समारंभाने कार्यक्रमाची सांगता होईल. मराठी भाषाप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी संमेलनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे सचिव रमेश बक्षी, आयोजन समितीचे अध्यक्ष रवींद्र काटोलकर, संयोजन सचिव डॉ. वंदना बडवाईक, सहसंयोजक संध्या महाजन यांनी केले आहे. अनिल गोतमारे,सपन नेहरोत्रा, प्रदीप बिबटे यांची देखील पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.

Nagpur pin code number
Nagpur is famous for
Hmpv nagpur
Hmpv virus nagpur
Nagpur which state
Nagpur map
Nagpur Pin code
Nagpur in which state in Map