(Amravti)अमरावती : जिल्ह्यातील तिवसा शहरातील फुले, शाहू, आंबेडकर,अब्दुल कलाम वैचारिक कृती समितीच्या वतीने भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चातून (Nanded)नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव,मुंबईच्या वस्तीगृहात झालेल्याबलात्कार प्रकरणाची चौकशी, आळंदी येथील पारधी समाजावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे,मुस्लिम समाजावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे,व एससी, एस. टी, ओबीसी घरकुल योजनेचे प्रकरण तातडीने निकाली काढावे अशा विविध मागण्या घेऊन तिवसा तहसील कार्यालयावर मोर्चा एल्गार मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व (Adv. Deepak Sardar)ऍड. दीपक सरदार, (Rajesh Wankhade of Bhim Brigade)भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांनी केले. या मोर्चात शेकडो महिला,युवक व भीम सैनिक सहभागी झाले होते.