Home MAHARASHTRA योग दिवस विदर्भातील शेतकऱ्यांना समर्पित-डॉ. आशिष देशमुख

योग दिवस विदर्भातील शेतकऱ्यांना समर्पित-डॉ. आशिष देशमुख

0

(Nagpur)नागपूर -देशातील सर्वात मोठे आदर्श गाव खुर्सापार (ता. काटोल) येथे भव्य ‘जागतिक योग दिनी शेतकरी आणि ग्रामीण महिलांसोबत योगा करून माजी आमदार भाजपनेते डॉ. देशमुख यांनी स्वस्थ आणि प्रगतीशील भारताचा केला संकल्प. योगदिन विदर्भातील शेतकऱ्यांना समर्पित केल्याची भावना बोलून दाखविली.

(“Prime Minister Narendra Modi)“पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण विश्वाला निरोगी करण्याचे काम करीत आहेत. केंद्र सरकारतर्फे २१ जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक राज्यातून एका गावाची निवड करून ते गाव ‘संपूर्ण योग ग्राम’ म्हणून विकसित केले जाणार आहे. महाराष्ट्रातील २७,००० गावांतून हा मान खुर्सापार (ता. काटोल, जि. नागपूर) ग्रामपंचायतीला मिळाला आहे. या आदर्श गाव पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी केली असून या ग्रामपंचायतीला केंद्र आणि राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘संपूर्ण योग ग्राम’ म्हणून खुर्सापारला विकसित केले जाणार आहे तसेच येथे वर्षभर योगासंबंधी कार्यक्रम घेतले जाणार आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. योगामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले असून ते निरोगी जीवन जगत आहेत. शेतकरी, मजूर, अबाल वृद्ध, स्त्री, पुरुष, विद्यार्थी व समस्त नागरिकांचे निरोगी शरीर व दीर्घ आयुष्याकरिता दैनंदिन जीवनात योगसाधना अत्यंत उपयोगी आहे.

देशातील सर्वात मोठे आदर्श गाव खुर्सापार (ता. काटोल, जि. नागपूर) येथे भव्य जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच सुधीर गोतमारे आणि ग्रामस्थांनी योगसाधनेत भाग घेतला.