(Nagpur)नागपूर -काटोल (Katol) तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या कोंढाळी ग्राम पंचायतीला नगर पंचायतचा दर्जा मिळावा ही अनेक दिवसापासुनची मागणी होती. या निर्णयावरून आ अनिल देशमुख, माजी आमदार व नुकतेच भाजपात आलेले डॉ आशिष देशमुख (Dr Ashish Deshmukh)यांच्यात श्रेयाची लढाई पहायला मिळत आहे
(MLA Former Home Minister Anil Deshmukh)आमदार माजी गृहमंत्री अनिल देशमुख व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सातत्याने या संदर्भात पाठपुरावा केला.अखेर राज्य शासनाच्या माध्यमातुन शासन आदेश पारित करुन कोंढाळी ग्राम पंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
(Kondhali)कोंढाळीची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ग्राम पंचायत वरुन नगर पंचायत करण्यासंदर्भात मागणी अनेक दिवसांपासुन प्रलंबित होती. यासाठी ग्राम पंचायत कोंढाळी नंतर पंचायत समिती काटोलचा ठराव घेण्यात आला. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन तो प्रस्ताव जिल्हा परिषद नागपूरकडे पाठविण्यात आला होता. जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कोंढालीला नगर पंचायतीचा दर्जा देण्यासाठी ठराव घेवून तो जिल्हाधिकारी नागूपर यांच्या मार्फत शासनाच्या ग्राम विकास विभागाला सादर करण्यात आला, त्रूटी दुर करुन सलील देशमुख यांनी पुढाकार घेवून सुधारित प्रस्ताव १० एप्रिल २०२३ ला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत परत शासनाकडे सादर केला होता.
कोंढाळीला नगर पंचायतचा दर्जा देण्यात आल्याचा शासन आदेश निघताच नागरिकांनी सलील देशमुख यांच्यासह (NCP)राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर एकच जल्लोष केला. यावेळी कोंढाळी येथील काँग्रेस, शिवनेना व इतर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.