सुभाष देसाईंचे पूत्र शिंदे गटात जाणार, ठाकरे गटाला धक्का

0

मुंबई : उद्धव ठाकरे गटाला येत्या काळात आणखी एक धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भुषण देसाई हा शिंदे गटात प्रवेश करणार आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय. भुषण देसाई यांचा आजच शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. भूषण देसाई आजच मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा असून त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुभाष देसाई हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाई आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार आहे. भूषण देसाई यांच्या निर्णयामुळं शिवसेनेतल्या फुटीनंतर आणखी एका घरात फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. भूषण देसाई एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा