आश्चर्य,‘ईपीजेनेटिक होमिओपॅथी’ने मुलामध्ये विकसित झाले लिंग ! – डॉ रवि वैरागडे यांचा दावा

0

नागपूर : नागपुरात ‘ईपीजेनेटिक्स होमिओपॅथी’ उपचाराच्या माध्यमातून बंगलोरच्या एका मुलात लिंग विकसित झाल्याचा दावा जेनेटिक हेल्थ आणि ईपीजेनेटिक होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. रवी वैरागडे यांनी केला.

या मुलाचे लिंग जन्मतः विकसित न झाल्याने पाच वर्षे या मुलाचे पालक जगभरातील विविध डॉक्टरांकडे गेले. परंतु, नागपुरातच ‘ईपीजेनेटिक्स होमिओपॅथी’च्या उपचारातून मुलात लिंगाचे अवयव विकसित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. रवी वैरागडे हे नागपुरात नुकत्याच झालेल्या सी २० च्या आरोग्य चमूचे सदस्य होते हे विशेष. बहुतांश रुग्णालयात तज्ज्ञांनी बालकात लिंक विकसित होणे शक्य नसून तो १६ वर्षांचा झाल्यावर प्लास्टिक सर्जरीतून कृत्रिमरित्या ते तयार करावे लागणार असल्याचा सल्ला दिला. माहिती मिळाल्यावर शेवटचा उपाय म्हणून ते माझ्याकडे आले. ‘ईपीजेनेटिक होमिओपॅथी’ पद्धतीने आम्ही मुलावर उपचार सुरू केले. आश्चर्य म्हणजे सुमारे तीन महिन्यांतच मुलाचे लिंग विकसित होत असल्याचे सकारात्मक चिन्ह दिसले. यावेळी हा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. दीड वर्षांत मुलाचे लिंग चांगले विकसित झाले. आता हा मुलगा सामान्य मुलाप्रमाणेच असल्याचेही डॉ. वैरागडे म्हणाले. आता या मुलाच्या उपचारावरील संशोधनात्मक अभ्यास वैद्यकीय जर्नलमध्ये देण्याची प्रक्रिया करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या मुलाचा जन्म झाल्यावर डॉक्टरही हा मुलगा की मुलगी हे सांगू शकत नव्हते याकडे त्यांनी लक्ष वेधले. नागपुरातील ॲडव्हांस हेल्थ फॅमिली मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये सुमारे ५०० असाध्य आजार म्हणजे मूत्रपिंड किंवा यकृत फेल्युअरसह इतरही गुंतागुंतीच्या आजाराचे रुग्ण आले. ‘एपीजेनेटिक्स होमिओपॅथी’तून काहींची औषधे कमी झाली, तर काही पूर्णपणे आजार रिव्हर्स होऊन बरे झाल्याचाही दावा डॉ. वैरागडे यांनी केला. यावेळी डॉ. मीनल वैरागडे आणि डॉ. आकाश मघाडे उपस्थित होते

नागपूरचे डॉ रवि वैरागडे जेनेटिक हेल्थ आणि एपिजेनेटिक तज्ञ म्हणून देशभरात प्रसिद्ध आहेत. गेली 28 वर्षे त्यांची टीम देश-विदेशात चर्चासत्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करते. फ्रान्स,ऑस्ट्रिया, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया येथून रुग्णू उपचारासाठी नागपुरात आले आहेत. प्रत्येक आजाराचे मूळ हे जीन्स मध्ये असते. जेनेटिक हॉलीस्टिक उपचार पद्धतीद्वारे या जीन्सवर काम करून असाध्य रोगांवर उपचाराची किमया साधता येते. अनेक रोगांचा उपचार ऍलोपॅथिक उपचार पद्धतीमध्ये नाही. हॅपी जेनेटिक होमिओपॅथीच्या माध्यमातून रोगांवर मुळापासून इलाज केला जातो. यात क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस, कॅन्सर किडनीच्या 4 लाख पेक्षा अधिक केसेस आपण सांभाळल्याचा दावा वैरागडे यांनी केला. रोग निदान झालेल्या लोकांचे व्हिडिओज उपलब्ध आहेत. एकप्रकारे ‘ट्रीट फ्रॉम होम’ कन्सेप्ट आणि 360 हीलींग सेंटरच्या माध्यमातून देश विदेशात रुग्णांमध्ये एक नवी उमेद जागवण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे