विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करणारा शिक्षक गजाआड

0

नागपूर : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. एका ५७ वर्षीय शिक्षकाने इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली (Sexual abuse of a 6th class student) आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी संजय विठ्ठल पांडे या आरोपी शिक्षकाविरुद्ध भादंविच्या ३७६ व पोक्सो कायद्यान्वये गुन्हे नोंदविले असून त्याला अटक केली आहे. एका सरकारी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपी शिक्षक पीडीत मुलीला शाळेच्या सायन्स लॅबमध्ये नेऊन तेथे तिचे लैंगिक शोषण करीत होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. मागील सहा महिन्यांपासून शाळेत हा धक्कादायक प्रकार सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थीनी सहाव्या वर्गात शिकत असून ती वय १२ वर्षांची आहे. पीडीत मुलगी आईकडे सातत्याने पोटदुखीची तक्रार करीत होती. तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने लैंगिक अत्याचारांची माहिती दिली. कुटुंबीयांनी त्यानंतर सक्करदरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संजय विठ्ठल पांडे या आरोपी शिक्षकाला अटक केली. त्याचा पोलिस कोठडी रिमांड घेण्यात आला आहे.