नागपूर – पोलीस आयुक्तालयात मोठ्या संख्येने कार्यरत राहणाऱ्या महिला कर्मचारी तसेच येथे आपल्या समस्या घेवून येणाऱ्या महिला भगिनी यांना अचानक येणाऱ्या मासिक पाळीच्या वेळेला गैरसोय निर्माण होऊ नये या विषयाला लक्षात घेता, श्री स्वामी समर्थ बहुउद्देशिय संस्थेतर्फे पोलीस भवन येथे सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे यांना सैनिटरी पैड वेंडिंग मशीन ही भेट म्हणून देण्यात आली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ता नूतन रेवतकर यांच्या तर्फे सैनिटरी पैड वेंडिंग मशीन महिला कर्मचाऱ्यांच्या समक्ष सुपूर्द करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ता नूतन रेवतकर यांनी महिलांच्या हायजीनला तसेच त्यांच्या निरोगी स्वास्थ्याचा विषय लक्षात घेत पोलीस भवनाला भेट केलेली ही पहिली सैनिटरी पैड वेंडिंग मशीन या उपक्रमाचे नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे यांनी स्वागत करून या उपक्रमाची प्रशंसा ही केली. या प्रसंगी पोलीस निरीक्षक आशालता खापरे , मपोशी श्रद्धा ढोमने , मपोशी संगीता , संस्था सचिव पूनम रेवतकर, सदस्य पायल रेवतकर, आकाश रेवतकर उपस्थित होते