विरोधकांवर दडपशाही – वरुण सरदेसाई

0

नागपूर: आज नको त्या विषयाला महत्त्व देत सामान्यांचे प्रश्न बाजूला ठेवले जात आहेत. विरोधकांवर दडपशाहीचे राजकारण सुरू आहे मीडिया देखील यात सुटला नाही. याच दडपशाहीला चपराक देणारा कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आहे असे मत ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी आज व्यक्त केले. सिनेट निवडणुकीत मविआची तयारी, नागपूर आणि रामटेक मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या बैठका, यादृष्टीने त्यांचा हा नागपूर दौरा होता. ठाकरे गटात निष्ठावंत आजही मोठ्या प्रमाणात कायम असून महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जात आहे. नागपुरातील सिनेट निवडणुकीत देखील मविआला चांगले यश मिळेल असा दावा त्यांनी केला. दरम्यान, शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मुलाचा शिंदे गटातील प्रवेश दडपणातून झाला का, असे विचारले असता हे त्यांनाच विचारलेले बरे असे ते म्हणाले. मात्र या संदर्भात स्वतः सुभाष देसाई यांनीस्पष्ट निवेदन केले आहे. गेली 50 वर्षे ते शिवसेनेसोबत आहेत . दरम्यान, सध्या गाजत असलेल्या शितल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. अशावेळी प्रकाश सुर्वेंच्या मुलानेच खरा व्हिडिओ लाईव्ह केल्याचे विधान वरून सरदेसाई यांनी आज केले. शितल म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे तर मग खरा व्हिडिओ कुठे असा सवालही त्यांनी केला. याप्रकरणी खरा व्हिडिओ समोर आलाच पाहिजे, पोलिसांनी तो शोधून काढावा यावर भर दिला. विशेष म्हणजे या संदर्भात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

https://youtu.be/5O7LbefTEcM

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा