जलजागृती सप्ताह १६ ते २२ मार्च

0

 

नागपूर -लोकसहभागातून जलसमुध्दी ही संकल्पना घेवून दरवर्षी १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येतो. जलजागृती सप्ताहाचे हे सातवे वर्ष असून या वर्षी १६ ते २२ मार्च २०२३ या कालावधीत जलसंपदा विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, शिक्षण विभाग, माहिती विभाग, बानाई व भारतीय जलसंसाधन संस्था (IWRS) नागपूर केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरा करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमासाठी जनतेनी उपस्थित रहावे असे अव्हान राजेंद्र मोहिते, समिती अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक, विपाविम, डॅा. प्रकाश पवार, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर. अशिष देवगडे, मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, राजेश सोनटक्के, विदर्भ समन्वयक तथा अ. अ. विपाविम नागपूर, पद्माकर पाटील, नागपूर जिल्हा संयोजक तथा अधिक्षक अभियंता, लाक्षेविप्रा. भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष संजय वानखडे, सचिव डॉ. प्रवीण महाजन, बानाईचे अध्यक्ष अरविंद गेडाम यांनी केले आहे.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा