ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री डॉ. दीपक सावंतही आता शिंदे गटात

0

मुंबई : शिवसेना नेते व माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे शिंदे गटात प्रवेश करणार आहे. सावंत यांचा बुधवारी सायंकाळीच शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती असून ठाकरे गटाला हा आणखी एक धक्का असल्याचे मानले जात आहे. (Deepak Sawant to join Shinde fraction) ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. आता आणखी एका बड्या नेत्याचा गटात प्रवेश होत आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा पक्षप्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवन येथे पार पडणार आहे.
दीपक सावंत हे विधानपरिषदेचे माजी सदस्य होते. शिवसेनेकडून त्यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.जुलै २००४ मध्ये त्यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यानंतर २००६ आणि २०१२ मध्ये ते पुन्हा निवडून आले. डिसेंबर २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात दीपक सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. याचवेळी त्यांच्याकडे भंडारा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा