१०० व्या नाट्य संमेलनास नाट्यदिंडीने उत्साहात सुरुवात

0

 

लातूर – राज्य शासनाचा पर्यटन,सांस्कृतिक कार्य विभाग आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने लातुरात चार दिवसीय विभागीय १०० व्या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज नाट्यदिंडीने या संमेलनास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. शहरातील गंजगोलाई येथील श्री जगदंबा देवीची आरती करुन या नाट्यदिंडीस सुरुवात करण्यात आली.

यावेळी (Veteran actor Mohan Joshi)ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, (Actor Bharat Jadhav)अभिनेते भरत जाधव, (Veteran actor Vijay Gokhale)ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, भाजप आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या नाट्यदिंडीत पारंपारिक वेशभूषेत लोककलावंतांनी लोककलांचे सादरीकरण केले. टाळ-मृदंगाच्या गजरात, हलगी आणि ढोल-ताशाच्या तालावर निघालेल्या या दिंडीत धनगरी नृत्य, संबळ वादन, ढोल-ताशा आणि हलगी वादन यासह विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले.