

नागपूर (Nagpur):- आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती प्लॉट नंबर 15 अप्सरा लॉन जवळ हुडकेश्वर रोड नागपूर तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती मोठ्या उत्साहाने,आनंदाने व धूमधडाक्यात साजरी करण्यात आली असून त्यानिमित्ताने राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला सकाळी 7=30 वाजता सौ.सरस्वतीताई व महादेवराव पातोंड या उभयतांच्या हस्ते विधीपूर्वक अभिषेक करण्यात आला पूजा आरती नंतर अहिल्या देवीच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.

दरवर्षी जनजागर म्हणून मोटार/कार ,बाईक रॅली काढण्यात येत होती परंतु या वर्षी सरकारच्या पेट्रोल/डिझेल बचाव आव्हानाला साथ देत काही किलोमीटर पायदळ रॅली काढण्यात आली.रॅली मध्ये समाज बांधव ,भगिनी,युवक, युवतीनी सहभाग घेतला. त्यानंतर 9=30 वाजता समस्त समाज बांधव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक अजनी येथील आयोजित कार्यक्रमा करिता रवाना झाले. अहिल्या मंदिर हुडकेश्वर रोड नागपूर येथेआज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाला महसूल मंत्री तथा पालकमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे, पद्मश्री डॉ. विकासजी महात्मे, आमदार कृपालजी तुमाने, महापौर निताताई ठाकरे, उपमहापौर लिलाताई हातीबेड, सभापती रूपालीताई ठाकूर, मंगलाताई खेकरे, ज्योतीताई देवघरे, नगरसेवक अजय बोढारे, योगेश मडावी, निहारिका खोदले, डॉ.सुनीता महात्मे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सचिव महादेवराव पातोंड यांनी केले प्रस्थाविकेमधे त्यांनी समाजाच्या काही मागण्या मा.महापौर निताताई ठाकरे यांचे कडे केल्या मा.महापौर यांनी समाजबांधवांना उद्बोधन करतांनी समाजाच्या नागपूर मधील काही समस्या सोडविण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल असे आश्र्वासित केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला
आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महादेव पातोंड, मधुकर काळमेघ, रमेशजी ढवळे,अनिल ताबडे, विनोद बरडे, शरद उरकुडे, रामजी सोनाग्रे, सतीश होपड, विनोद अवझे, विनोद भुजाडे, हरीश खुजे, वंदना बरडे, अश्विनी उरकुडे, संजीवनी घुरडे, विद्या सोनाग्रे,भाजपा कार्यकर्ते श्री श्यामभाऊ थोरात ,विठ्ठलराव निगोट,भालचंद्र महाजन,राम लोही,राजेश लोही,सतीश होपड डॉ.,दीपक कापडे,विनोद भुजाडे,विनोद अवझे, अंकुशराव वरखडे, रवी सुलताने,सुभाष बुधे,राजेश उपासे तसेच डॉ.सौ.सुनीता महात्मे,अश्विनी उरकुडे,रजनीताई काळमेघ,ज्योती कापडे ,कामिनी तवले, स्मिता तांबडे, मीनाक्षी लोही,विनिता पुनसे,अनिता त्रिकुळ ,सुधाताई अवझे इत्यादी महिला व पुरुष मोठ्या संख्येने सामील झाले होते. समारोपीय भाषण श्री महादेवराव पातोंड, डॉ. रमेशजी ढवळे, स्त्री रोग तज्ञ डॉ.सुनिता महात्मे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ वंदना बरडे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन डॉ.दीपक कापडे व नेहा लोही आणि आभार प्रदर्शन श्री राम सोनाग्रे यांनी केले.


















