सुतळी बॉम्ब फोडून अधिकाऱ्यांना दिले निमंत्रण,उद्या कापणार केक!

0

 

अकोला – अकोल्यात एका शेतकरी पुत्राने अर्धवट असलेल्या रस्त्याच्या वाढदिवसाचे अनोखे निमंत्रण अधिकाऱ्यांना दिले आहे. अकोला ते शेगाव पालखी मार्गाचे गेल्या सात वर्षापासून काम सुरू आहे.

पण हे काम अजूनही अर्धवट आहे. गेल्या सात वर्षापासून भ्रष्टाचाराचा कळस ठरलेल्या पालखी मार्गाचे काम प्रवासी नागरिकांसाठी डोकेदुखी सोबतचं जीव घेणे सुद्धा ठरत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागरिकांनी उद्या 17 जानेवारीला अपूर्णावस्थेत असलेल्या रस्त्याचा आठवा वाढदिवस मोठ्या जल्लोषात कासव गतीने चालू असलेल्या पारस येथील अर्धवट बांधकामाच्या ठिकाणी करण्याचे नियोजित केले आहे याप्रसंगी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार यांना विभागाच्या परिसरात सुतळी बॉ-म्ब फोडून प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांच्या माध्यमातून निमंत्रण देण्यात आले. उद्याला या रोडवर केक कापून आठवा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.