The Burning Car नागपुरात द बर्निंग कार चा थरार तुकडोजी चौकातील घटना, वाहतूक प्रभावित

0

नागपूर. गेल्या काही दिवसांपासून वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अगदी दुचाक्यांपासून ते थेट आपली बसपर्यंत धावत्या वाहनांमध्ये आग लागत आहे. अशीच एक घटना आज सकाळी नागपूर शहरातील तुकडोजी महाराज चौकात (Tukdoji Maharaj Chowk in Nagpur city) घडली. रस्त्याने धावत जाणाऱ्या कारला अचानक आग (running car suddenly caught fire ) लागली. क्षणार्थात आगीने संपूर्ण गाडीला विळखा घातला. अग्नीशमन दलाच्या जवानांनी चारही बाजुने पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. पण, या घटनेत आगीचे मोठे नुसकान झाले आहे. सकाळी वर्दळीच्या वेली ही घटना घडल्याने मार्गावरील वाहतूक बराचकाळ खोळंबली होती. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. धावत्या वाहनांना लागलेल्या आगीमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आग लागण्याच्या घटनांच्या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांचा चांगलाच राबता होता. त्याचवेळी जळालेले वाहनही रस्त्याने धावत होते. अचानक काहीसा धूर येत असल्याचे जाणवले. यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत वाहन थांबलिले व बाहेर आला. काही कळण्यापूर्वीच आगीचे लोळ निघणे सुरू झाले. रस्त्याने जाणाऱ्यांनी थांबून वाहनचालकाची मदत करण्याचा प्रयत्न केला. पण, आग आटोक्यात येण्या ऐवजी वाढतच होती. अनेकांनी आपल्या डोळ्यांनी या द बर्निंग कारचा थरार अनुभवला. गर्दीतीलच कुणी अग्निशमन दलाला सूचना दिली. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान बंबासह दाखल झाले. तोवर आगीने रौद्ररूप धारण केले होते. जवानांनी लागलीच पाण्याचा मारा सुरू केला. सुमारे दीड तासांच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. जळालेले वाहन शासकीय असल्याचे सांगण्यात आले. आगीचे नेमके कारण कळू शकले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेत वाहनाच्या आतील भाग पूर्णतः जळाला. धावत्या वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटनेसाठी जुण्या व जिर्ण वायरिंग कारणीभीत ठरत असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. यामुळे वाहनाची नियमित देखभाल दुरुस्ती केली जाते. अगदी त्याच पद्धतीने आतील वायरिंगचीही चाचपणी करावी. बरेचदा वाहन दुरुस्ती करणारे तात्पूरती व्यवस्था म्हणून वायर जोडतात. पण, आवश्यक खबरदारी घेतली जात नाही. वाहन सुरळीत चालत असल्याने चालकही दुर्लक्ष कराता. याच दुर्लक्षितपणामुळे असा घटना घडण्याची शक्यता बळावत असल्याचे मेकेनिक पवन सारवे यांनी सांगितले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा