
चद्रपूर : शहर जिल्ह्यात नऊ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. सुमारे बाराशे मिलिमीटर वार्षिक पर्जन्य सरासरी असलेल्या या जिल्ह्यात आजच्या दिवसांपर्यंत 70 टक्के पाऊस पडला आहे.
यामुळे नदी नाले व धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी भागाला जोडणाऱ्या झरपट नदीच्या कमी उंचीच्या पुलावर पुराच्या पाण्यातून कार घालणे वाहन चालकाला महाग पडले. अत्यंत खळाळणारा प्रवाह दिसत असताना या कारमधील दोघांनी कार पुढे दामटली. मात्र अर्ध्या रस्त्यात कार हेलकावे घेऊ लागली. थोड्या वेळातच कार पुलावरून खाली कोसळली. या कारमध्ये असलेल्या दोघांनी दार उघडून कसेबसे झाडाला धरून ठेवल्याने बचावले. पुराच्या पाण्यात वाहन घालू नका अशा आशयाचे आवाहन केल्यानंतरही अशा घटना वारंवार घडत आहेत.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















