Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरचा ‘कांस्य’वेध

0

Paris Olympics 2024: भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे.

Manu Bhaker Wins Bronze Medal Paris Olympics 2024: पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेत (Paris Olympics 2024)  भारताच्या मनू भाकरने (Manu Bhakar)महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे. कोरियाच्या ओह ये जिन हिने सुवर्णपदक पटकावलं आहे.

कांस्य पदक जिंकल्यानंतर काय म्हणाली?

मला खूप छान वाटतंय. मी यासाठी खूप मेहनत घेतली होती. कांस्य पदक जिंकले असले तरी मला आनंद आहे की मी देशासाठी जिंकू शकले. हे पदक सर्वांचं आहे. कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं. कुटुंब, प्रशिक्षक आणि भारतीयांच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार असं मनू भाकर म्हणाली. कांस्य पदक जिंकल्यानंतर मनू भाकरने सांगितले की, तिने भगवद्गीता वाचली होती आणि त्यातून प्रेरणा घेऊन ती पदक जिंकण्यात यशस्वी ठरली. मनू भाकर 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्तूलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे पदक जिंकू शकली नव्हती.

फायनलमध्ये मनू भाकरचा स्कोर

पहिली 5 शॉट सीरीज: 10.6, 10.2, 9.5, 10.5, 9.6, एकूण 50.4
दुसरी 5 शॉट मालिका: 10.1, 10.3, 9.6, 9.6, 10.3, एकूण: 49.9
उर्वरित शॉट्स: 10.5, 10.4, 9.8, 9.8, 9.9, 10.2, 10.1, 10.2, 10.1, 10.0, 10.1,10.3

कोण आहे मनू भाकर?

22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे.

नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण

जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.

Paris olympics 2024 india qualification
Paris olympics 2024 wikipedia
Paris Olympics 2024 tickets
2024 Summer Olympics
Paris Olympics schedule
Winter Olympics 2024
Paris 2024 schedule PDF
2024 Olympics held in which country