मुख्यमंत्री म्हणाले, तोवर मनोज जरांगे यांनी थांबायला हवे !

0

 

मुंबई- मराठा आंदोलक MARATHA SAMAJ  मोर्चाने निघाले असलेत तरी मराठा समाजाबद्दल मी बोललो आहे. खरं म्हणजे राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. मनोज जरांगे पाटील  Manoj Jarange Patil यांच्या सूचना ज्या ज्या आल्या त्या त्याप्रमाणे दाखले देण्याचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे हजारो लाखो लोकांना जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते. नोंदी मिळत नव्हत्या त्या लोकांना प्रमाणपत्र दिले गेलेत.तेलंगाना हैदराबादमध्ये जुने दस्तावेज आहेत. त्यामध्ये उर्दू पारसी मोडी लिपीतले कागदपत्र आहेत तिथे एक्सपर्ट आपण दिले आहेत ते देखील काम युद्ध पातळीवर जस्टीस शिंदे कमिटी करत आहे. एकीकडे कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर देण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे मागासवर्ग आयोग काम करत आहे .मराठा समाज मागास कसा आहे त्याचा इम्पिरिकल डेटा तयार करत आहेत. मागासवर्ग आयोगाने रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचे काम होईल
मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता किंवा इतर समाजाला अन्याय करता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. आंदोलकांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे आणि टाळलं पाहिजे त्यामुळे जनतेला त्रास होणार आहे.मराठा समाजाला जे काही आरक्षण रद्द झालं सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेस त्या त्रुटी ऑब्झर्वेशन निदर्शनास आणून दिल्या गायकवाड आयोगाच्या यावर काम करत आहे.तोपर्यंत जरांगे पाटील यांनी थांबलं पाहिजे ही सर्व जनतेची, सरकारची भावना आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.