पंतप्रधान मोदींबद्धल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मिटकरींना मुख्यमंत्र्यांनी झापले

0

नागपूरः राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे एक ट्विट वाचून दाखवले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रावण असा उल्लेख करण्यात आला होता. मिटकरी यांच्या या विधानाने विधान परिषदेतील सत्तारूढ सदस्य संतप्त झाले. त्यापायी सभागृहाचे कामकाजही तहकूब झाले. कामकाज सुरु झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक होत मिटकरी यांना चांगलेच खडसावले. शिंदे म्हणाले, “आम्हाला बोलला ते आम्ही सहन करून घेतो. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वक्तव्य सहन केले जाणार नाही. सभागृहाचे पावित्र्य आपणच राखले पाहिजे. आपण काय बोलत आहोत, याचे भान ठेवले पाहिजे. पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कोणीही अपशब्द उच्चारु नये” या शब्दात शिंदे यांनी मिटकरी यांना झापले. त्यानंतर मिटकरी यांनी मोदी यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली.
एका लक्षवेधीवर चर्चा सुरु असताना मिटकरी पंढरपूर कॉरिडोरचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे वादग्रस्त ट्विट वाचून दाखवले. त्यामुळे विधान परिषदेतील वातावरण चांगलेच तापले होते. सत्तारूढ पक्षाचे सदस्य अतिशय संतप्त झाले. त्यांनी मिटकरी यांच्या विधानाचा निषेध नोंदविला. त्यापायी सभागृहाचे कामकाजही तहकूब झाले होते. शेवटी त्यांचे वक्तव्य सभागृहाच्या कामकातूनही काढण्यात आले. मिटकरी यांनीही त्यावर दिलगिरी व्यक्त केली.