गोल बाजारातील प्रसिद्ध राम मंदिरात अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती

0

 

वर्धा – आज श्रीराम नवमी निमित्ताने शहरातील प्रसिद्ध राम मंदिर येथे एमटीडी ज्वेलर्स ढोमणे परिवाराच्या वतीने अयोध्येला होत असलेल्या राम मंदिराची प्रतिकृती दोन दिवसांसाठी राम मंदिरात ठेवण्यात आली आहे. या प्रतिकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रतिकृती हॉलमार्क सव्वा किलो चांदीने बनवण्यात आली असून ही प्रतिकृती दिल्लीवरून बनवून आणण्यात आली आहे. सहा ते सात कारागिरांनी ही प्रतिकृती तयार केली आहे.

श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकऱ्यांशी चर्चा करून ही प्रतिकृती मंदिरात भाविकांना दर्शनासाठी दोन दिवस ठेवण्यात येणार असल्याचे सौरभ ढोमणे यांनी सांगितले.

 

 

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा